सोमेश्वर रिपोर्टर टीम...
निरा : विजय लकडे.
तरूणाईच्या मनात आले तर काय घडू शकते याची प्रचिती नींबूत ता. बारामती येथील बुवासाहेब नगर मधील तरुणांनी साकारलेल्या गणेश मंदिर पाहिल्यानंतर येते.
नींबूत , बुवासाहेब नगर मधील तरुणांनी नीरा मोरगाव रोड लगत काही स्वखर्च व काही लोकवर्गणीतून जे पैसे मिळाले त्यामधून एक सुबक असे गणेश मंदिर उभारले आहे.
तरुणांनी एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर काय होऊ शकते याची प्रचिती हे गणेश मंदिर पाहिल्यानंतर येते.
या मंडळामधील सभासद तरून गेल्या वीस वर्षापासून गणपती उत्सवामध्ये मंडळाचा गणपती बसवतात दहा दिवस गणपती बाप्पाची यथायोग्य पूजा करून त्याचे विसर्जनही करतात परंतु काही सभासद तरुणांच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण ही गणपतीची मूर्ती बारा महिने आपल्यासमोर राहील यासाठी एक गणपती मंदिर बनवूया. पण त्यासाठी लागणारी जागा मंदिर बनवण्यासाठी येणारा पैशाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला त्यानंतर गणपती मंडळाचे सभासद हनुमंत शिंदे यांनी या मंदिरासाठी लागणारी जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर सभासद वर्गणी व काही लोकवर्गणीतून जे पैसे जमा झाले यानंतर काही दानशूर व्यक्तींनी या मंदिरासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली त्यानंतर नीरा मोरगाव रोड राज्य मार्गालगत गणपती बाप्पाचे एक सुंदर असे मंदिर उभे राहिले आहे.
मंदिर पूर्ण झाल्यानंतर मंडळाच्या सभासदांनी बुवासाहेब नगर व आसपासच्या सर्व लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले
तरुणांनी केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे