Baramati News ! बारामतीच्या लोकन्यायालयात ५ हजार ५१० प्रकरणे निकाली : तब्बल २१ कोटी रुपयांची वसुली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामतीचे मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे पी दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सुमारे पाच हजार पाचशे दहा खटले निकाली निघाले असून सुमारे २१ कोटी रुपयांची भरपाई वसूल झाली आहे.
          मुख्य जिल्हा न्यायाधीश जे.पी दरेकर, जिल्हा न्यायाधीश जे ए शेख,  मर्चीया कोर्ट, वानखेडे कोर्ट,आटकारे कोर्ट, पाटील कोर्ट, चिकणे कोर्ट व आपटे कोर्ट यांनी प्रमुख पॅनल जज म्हणून काम पाहिले. तर लोक अदालत समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले. सदर लोकन्यायालय मध्ये दाखल पूर्व प्रकरणांमध्ये ५ हजार २०३  प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये बँकेची वसुली नगरपरिषद वसुली  वीज बिल इत्यादी तीन कोटी ७८ लाख १३ हजार ३५५ रुपये वसूल झाले. याशिवाय पूर्वीची वसुली होली बाबतचे खटल्यातून  ३०३ खटले  निकाली निघून १७ कोटी नऊ लाख ४५ हजार ७१५ रुपयांची वसुली झाली. अपघात विमा मध्ये एक कोटी ४६ लाख ७३ हजार रुपयांची वसुली झाली.
-----------------------/
मोटर अपघात क्लेमच्या एकाच खटल्यात ५० लाख रुपयांची उच्चांकी  भरपाई देण्याची तडजोड एका खटल्यात झाली. दोन वर्षांपूर्वी एडवोकेट जी एम आळंदीकर यांनी एका पक्षकाराच्या वतीने हा खटला दाखल केला होता. त्याना सहाय्यक सरकारी वकील पी .टी पांढरे यांनी सहकार्य केले.सदर खटला चालू असताना विमा कंपनीने तडजोडीद्वारे ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले. कंपनीच्या वतीने एडवोकेट हरीश तावरे यांनी काम पाहिले. कंपनीचे प्रशासनिक अधिकारी आनंद डोळे यावेळी उपस्थित होते. सदरची तडजोड मोटार अपघात न्यायाधिकरण मेंबर तथा जिल्हा न्यायाधीश जे ए शेख यांचे समोर झाली.
--------------------
...............आणि ते खाली आले
 लोकन्यायालयाचे महत्त्व सर्वांना समजावे लोकन्यायालयाची लोकांनी भीती बाळगू नये म्हणून या दिवशी न्यायालय डायस वर न बसता खाली खुर्चीवर पक्षकारांसमोर बसते. मात्र आज एका खटल्यामध्ये वयस्कर पक्षकार महिलेला चालता येत नसल्याचे एडवोकेट आळंदीकर यांनी पॅनलचे जज जे ए शेख  साहेब यांना सांगितले. त्यावर त्वरित  शेख साहेब हे  मुख्य जिल्हा न्यायाधीश जे पी दरेकर मॅडम यांचे समवेत  दोन मजले खाली उतरून स्वतः पक्षकारांजवळ गेले त्यांच्याशी खटल्याबाबत चर्चा करून सोपस्कार पूर्ण केले. सदर बाबीवरून लोकन्यायालय हे लोकांसाठीच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
To Top