सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील रामराजे वि का सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर मनोहर जगताप तर उपाध्यक्षपदी विमल पोपटराव जेधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चंद्रशेखर जगताप यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी ही निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मावळते अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, संचालक कुमार जगताप, मा. अध्यक्ष नानासाहेब जगताप, रणजित जगताप, अशोक जाधव, विरेंद्र जगताप, प्रशांत जेधे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांनी काम पाहिले, त्यांना सचिव किरण जगताप व सहसचिव प्रदीप जगताप यांनी सहकार्य केले.