Baramati News ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात 'प्लांट प्रोपागेशन टेक्नॉलॉजी आणि स्टार्ट-अप' कार्यशाळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामध्ये शनिवार, दिनांक ०३/०२/२०२४ रोजी 'प्लांट प्रोपागेशन टेक्नॉलॉजी आणि स्टार्ट-अप' ही कार्यशाळा पार पडली.
       विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेस प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ व देवराई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ ढोले यांनी मार्गदर्शन केले. औपचारिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. शुभम ठोंबरे यांनी या कार्यशाळेतून आपल्यासारख्या ग्रामीण भागात झाडांच्या लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोपवाटिकांसारखे व्यवसाय विकसित व्हावेत हा हेतू स्पष्ट केला. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी असणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अश्या कार्यक्रमाचे महत्व सांगितले.
     शिक्षण संस्थेच्या परिसरातील अजितदादा उद्याना अंतर्गत स्थापन केलेल्या सोमेश्वर देवराई मधे पार पडली. या वेळी देवराई मधील विविध देशी झाडांची निसर्गाचा समतोल राखण्यासाठी असणारी गरज व त्या झाडांच्या लागवडी संदर्भातील सखोल माहिती रघुनाथ ढोले यांनी प्रत्यक्ष झाडासमोर दिली. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋषिकेश गायकवाड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय बनसोडे, विद्यार्थी विकास अधिकारी संतोष पिंगळे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
       या कार्यशाळेसाठी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब कामथे, शिक्षण संस्थेचे संचालक प्रतिनिधी  आनंदकुमार होळकर, सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी सदिच्छा दिल्या. एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या कार्यशाळेचे सूत्र संचालन प्रा. कल्याणी करे यांनी तर आभार प्रा. समृद्धी पवार यांनी केले.
To Top