सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जावली ! कोयना जलाशयावर मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या जलपर्यटनाला शासनाची मान्यता : ४५ कोटी ३८ लाख खर्च, आठ महिन्यात होणार पहिला टप्पा पूर्ण

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर मौजे मुनावळे ता. जावळी येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसीत करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी 45 कोटी 38 लाख रुपये मंजुर झाले आहे. जिल्ह्यात जलपर्यटन विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.  त्यांच्या या पाठपुरव्याला यश आले आहे.
             कोयना धरण "शिवसागर जलाशय' यावर मौजे मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन (Aquatic Tourism) विकसित करण्याबाबत त्यानुसार प्रकल्पाची व्यवहारता, वित्तीय बावी तपासून अनुसरुन शासनाने मान्यता दिली आहे.
सदर प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याच्यांद्वारे करण्यात येणार आहे .   बांधकामाचा खर्च हा पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास अदा करणार आहे. जल पर्यटनाशी संबंधित कामकाज तसेच प्रकल्पाचे प्रचालन हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाबरोबर करण्यात येणा-या सामंजस्य करारातील तरतूदीनुसार करण्यात यावी असे शासनाने स्पष्ट केले आहे..
मौजे मुनावळे, ता. जावळी, जि. सातारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याकरीता प्रकल्पास रु.४५.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिला टप्पा ८ महिन्यात आणि दुसरा टप्पा २० महिन्यात पुर्ण करण्यात यावा. जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याची कार्यवाही ही कोयना धरण (शिवसागर जलाशयाच्या) 'अ' वर्ग प्रतिबंधित क्षेत्रात होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  पर्यावरणाची हानी / हास होणार नाही तसेच जलपर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार  नाही याची दक्षता घेऊन जलाशयात मलजलप्रक्रिया केंद्र उभारणे, पर्यावरणस्नेही बोटींचा वापर इ. च्या माध्यमातून घेण्यात यावी, शासनाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे.
  पहिल्या टप्यातील खर्चासाठी/सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु.१३.६१ कोटी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासनाने मान्यता दिली  आहे. गुणनियंत्रण यंत्रणेद्वारे कामाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी केल्याचा प्रमाणित अहवाल तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा सचित्र दाखला आणि निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात यावे. 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जावली ! कोयना जलाशयावर मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या जलपर्यटनाला शासनाची मान्यता : ४५ कोटी ३८ लाख खर्च, आठ महिन्यात होणार पहिला टप्पा पूर्ण
जावली ! कोयना जलाशयावर मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या जलपर्यटनाला शासनाची मान्यता : ४५ कोटी ३८ लाख खर्च, आठ महिन्यात होणार पहिला टप्पा पूर्ण
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiw0gPC1f9495wTtkpDxsYOroV94ypnitTRYw8twqiQdZsz4CuA8d2lJN78bZFpcKInUuAmqlaX_c-fdTD-2waZ7HzVWm3lKdnsy8d675elaMgdcQwptVNNesxzDz5UOspLT2V_wPEUDBn6YGc4igYWECmBo59tHKkmT_QPOapr3dOuEXWYuGTYsG-fX7Mw
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiw0gPC1f9495wTtkpDxsYOroV94ypnitTRYw8twqiQdZsz4CuA8d2lJN78bZFpcKInUuAmqlaX_c-fdTD-2waZ7HzVWm3lKdnsy8d675elaMgdcQwptVNNesxzDz5UOspLT2V_wPEUDBn6YGc4igYWECmBo59tHKkmT_QPOapr3dOuEXWYuGTYsG-fX7Mw=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/02/blog-post_8.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/02/blog-post_8.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy