सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अजीव सदस्यपदी वाणेवाडी (ता.) बारामती येथील सुनील रघुनाथराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथे भोसले यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात भोसले यांचा सहभाग असतो. वाणेवाडी येथील कृष्णाई पतसंस्थेची स्थापना करत त्यांनी अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सुनील भोसले यांचे वडील ज्येष्ठ नेते रघुनाथराव भोसले यांनीही या अगोदर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही मोठी संस्था असून याठिकाणी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सुनील भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. संस्थेचे नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवडीनंतर भोसले यांनी दिली.
COMMENTS