निरा-बारामती रस्त्यावर एका चारचाकी गाडीने रस्त्याच्या कडेला असलेला खांबाला धडक दिल्याने अपघात झाला आहे.
मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. निरा-बारामती रस्त्यावर वाघळवाडी येथे अक्षय गार्डन शेजारील भारत पेट्रोल पंपापुढे सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यश देशमुख वय २२ रा. पुणे हा एम एच १२ टीएच. ०५६४ या चारचाकी स्विफ्ट गाडीतून बारामती वरून निरेच्या दिशेने जाताना डुलकी लागल्यामुळे यश याचा चारचाकी वरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. धडक बसताच विजेचा खांब तुटून गाडीवर पडला. वाघळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव सकुंडे यांनी तातडीने महावितरण ला फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले म्हणून पुढील अनर्थ टळला.