Bhor News ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान : राहुल गांधीचा जाहीर निषेध करत तहसीलदारांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी जातीवाचक विधान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भोर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार सचिन पाटील यांना निषेदाचे निवेदन देण्यात आले.
          पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीने ओबीसी आहेत व ते तेली समाजाचे आहेत असे जातीवाचक विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करून समाजातील सर्व जातीधर्माच्या समाजबांधवांच्या भावनांना ठेच पोचवुन समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.देशाचे पंतप्रधान हे कोणत्या जातीचे नसून ते संपूर्ण भारत देशाचे प्रथम नागरिक आहेत. त्यांच्याविषयी असे जातीवाचक विधान करणे चुकीचे व निंदनीय आहे तरी राहुल गांधी यांच्या बालिश विधानाचे भोर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध करीत निवेदन दिले.निषेध युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर बुदगुडे,जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभवजी सोलनकर, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शहर ध्यक्ष सचिन कण्हेरकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिजित कोंडे ,जिल्हा सचिव प्रमोद साबळे,महिला अध्यक्षा आशा शिवतरे, उपाध्यक्ष राजाभाऊ गुरव ,पल्लविताई फडणीस, स्वाती गांधी, संतोष लोहोकरे, पंकज खुर्द, दीपक तनपुरे, दीपक मालुसरे ,समीर घोडेकर, समीर बांदल ,सचिन म्हस्के, रोहन भोसले ,केदार साळुंखे, निलेश चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top