सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अज्ञात चोरट्यांनी गुरुवार दि.८ मध्यरात्री मेन लोखंडी दरवाजाचा कुलूप व कोंडा तोडून फोडले असल्याची घटना घडली.याची फिर्याद भोर पोलिसात राजू भीमराव उगळे (उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भोर मुख्यालय सहाय्यक) यांनी दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी भोर येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा मेन लोखंडी दरवाजाचा व त्याआतील लाकडी दरवाजाचे कुलूप व कोयंडा कशाच्या तरी साह्याने उचकटून कार्यालयामध्ये आत प्रवेश केला.कार्यालयातील उपअधीक्षक यांचे चेंबरच्या समोरील रूममध्ये असलेले लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र सदर कार्यालयातील कोणतीही वस्तू व कागदपत्रे चोरीला गेलेली नाहीत. तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उद्धव गायकवाड तसेच अतुल मोरे करीत आहेत.
-------------------
सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतपुस्तक, स्कीम उतारा ,गट नकाशा, आकार बंद ,सूडाचा नकाशा ,गुणाकार बुक ,प्रॉपर्टी कार्ड ,सर्वे नंबर नकाशा,जबाब नंबर अशी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असतात.भूमी अभिलेख कार्यालय हे शहराच्या बाहेरील बाजूस असल्याने चोरट्यांना सहजपणे चोरी करणे शक्य होते.या पार्श्वभूमीवर कार्यालयात व कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
COMMENTS