Khandala News l लोणंद 'शरद कृषी महोत्सव' : खिल्लार जातीचा देशातील सर्वात उंच ४१ लाखांचा बैल तर तब्बल सहा किलोचा कोंबडा पाहायला मिळणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद ; प्रतिनिधी
लोणंद येथे १५ फेब्रुवारी पासून डाॅक्टर नितीन सावंत विचारमंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या 'शरद कृषी महोत्सव' च्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखीतळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व मंडपाची पायाभरणी करून या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या तयारीला सुरुवात करण्यात आली.
          यावेळेस डॉक्टर नितीन सावंत यांनी सर्वांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले, यावेळेस म्हस्कू आण्णा शेळके , रघुनाथ शेळके , एडव्होकेट हेमंत खरात, राजू इनामदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास राजेंद्र डोईफोडे, संदीप शेळके, दिलीप घाडगे, वसंत पेटकर , शामसुंदर डोईफोडे, योगेश क्षीरसागर, मयुर गायकवाड, तेजस क्षीरसागर, योगेश पाटील, हेमंत पवार, पुरुषोतम हिंगमिरे, मनिष इंगळे, हरिष डोईफोडे, प्रदिप होळकर,अमोल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात दि १५ रोजी कृषी दिंडी काढून सुरुवात करण्यात येईल. तसेच या दिवशी पीक स्पर्धा (फळे) , गाय, बैल, म्हैस ,रेडा आदी प्राणी संवर्गातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दूपारी प्रदर्शनस्थळी वारकरी संप्रदायाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुर्तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर दि.१६ या रोजी महोत्सवाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी 'महाराष्ट्र माझा' हा शाहीर राजेंद्र कांबळे-कडूसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच भाजीपाला वर्गीय पीक स्पर्धा होणार आहेत. या महोत्सवात तिसऱ्या दिवशी दि.१७ रोजी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचा महिलांसाठी खास आकर्षण असलेला 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सादर होणार आहे तर ऊस या पीकाच्या व शेळी, मेंढ्या, घोडा, पक्षी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवात चौथ्या दिवशी दि.१८ ला 'महाराष्ट्राची गौरवगाथा' हा कार्यक्रम फुले व केळी या पीक स्पर्धा तसेच महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या खिल्लार जातीचा देशातील सर्वात उंच ४१ लाखांचा बैल आणि तब्बल सहा किलोचा कोंबडा शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहे. तर पाचव्या दिवशी दि १९ रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 

To Top