सुपे परगणा l गॅरेजला उभ्या असलेल्या १४ टायर गाडीचेपाच टायर डिस्कसह चोरले : सुपे पोलिसांनी साडेअकरा लाखांच्या मुद्देमालासह आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे ; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव-सुपा रस्त्यावर टाकळवस्ती भोंडेवाडी गावच्याहद्दीत शिवशंभू बॉडी बिल्डर गॅरेज समोरील मोकळ्या जागेत उभा  केलेली टाटा कंपनीचा MH 12 FZ 6651 या गाडीचे पाच काळा रंगाचे डिस्क सोबत असलेले टायर व दोन लाल रंगाच्या एक्साइड कंपनीच्या इलेक्ट्रिकल बॅटरी चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या सुपे पोलिसांनी आवळल्या आहेत. 
        याबाबत आबा शंकर भोसले रा. राजबाग काळखैरवाडी ता. बारामती जि. पुणे यांनी फिर्याद दिली. सदरची तक्रार प्राप्त होतात सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदाराच्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सदर संशयत दोन  इसम व एक ट्रक ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता यातील संशयत  ओंकार सचिन पवार, वय 20 वर्ष, व गौरव दत्तात्रय पवार, वय 22 वर्षे दोन्ही रा. रोमनवाडी पांडेश्वर ता. पुरंदर जि. पुणे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 
         त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले पाच डिस्क व टायर असे एकूण 1 लाख 50 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेला ट्रक MH अंदाजे किंमत 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक,  संजय जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग  सुदर्शन राठोड, श्रीकांत पाडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी,  पोहवा राहुल भाग्यवंत, गावडे,  पोलीस नाईक अशोक गजरे , पोलीस अंमलदार किसन ताडगे,महादेव  साळुंखे , तुषार जैनक, संतोष जावीर व नेहाल वनवे  यांनी मिळून केली.
---------------------
सुपा पोलीस यांच्याकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व ग्रामपंचायत यांनी मुख्य रस्ते, चौक, मंदिर व हायवे वरील सर्व आस्थापना यांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने व मालमत्ताविषयक गुन्हे कमी करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
To Top