सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे मा. सभापती प्रमोद काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून रूप पालटलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी वस्ती या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले, छोट्या वस्तीतील २४ पट असणाऱ्या शाळेतील बाल चमुनी तब्बल तीन तास आपला कलाविष्कार सादर केला.
आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन व समाज प्रबोधनाचे काम केले. धार्मिक गीता बरोबर समाज प्रबोधन गीताचे या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण होते, कार्यक्रमास आबल वृद्धांसह युवकांनी विशेषता महिला वर्गांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन नींबूतचे उपसरपंच अमर काकडे,श्रमजीवी पतसंस्था चेअरमन राजेंद्र काकडे, सोमेश्वर रिपोर्टर चे प्रतिनिधी विजय लकडे, ज्येष्ठ विधीज्ञ आदेश गिरमे, ग्रामपंचायत सदस्य शिरीष काकडे, सुवर्णा लकडे, शरद लकडे,अनुप लकडे,लक्ष्मण लकडे, राजेंद्र लकडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव, नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत सदस्य विद्यादेवी काकडे, जगदंबा डेअरीचे चेअरमन गणेश जगताप, सतीश काकडे, सुरज जगताप, शहाजी काकडे, व नींबूत केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश लकडे, उपाध्यक्ष संध्या लकडे, शिक्षिका विद्या भोसले,व कोळी वस्तीतील सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळ उपस्थित होते. उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निंबूत व पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेला भरघोस आर्थिक मदत दिली.
ज्ञयामध्ये ग्रामपंचायत निंबूतच्या वतीने शाळेस पन्नास लिटर पाण्याचा फिल्टर भेट देण्यात आला. शाळेच्या बौद्धिक व भौतिक सुविधांमध्ये गेल्या दोन वर्षात शाळेत अमुलाग्र बदल घडवण्यात आला आहे. प्रमोद काकडे यांच्या प्रयत्नाने शाळेला नवीन 15 लाखाची इमारत व एक शौचालय युनिट मंजूर करण्यात आले, तर युवा नेते गौतम काकडे,नींबूत सरपंच निर्मला काळे,उपसरपंच अमर काकडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत काळभोर, भाऊ कोळेकर,यांच्या प्रयत्नातून शाळेचे उर्वरित बांधकाम एक युनिट शौचालय, किचन सेट,लाईट फिटिंग,व इतर सुविधा पुरविण्यात आल्या, यामुळे शाळेचे पूर्ण रूप पालटले आहे. शाळेसाठी माजी सरपंच संगीता लकडे यांनी मोफत चार गुंठे जागा दिली आहे पुण्यातील एका नामांकित कंपनीद्वारे शाळेस दहा संगणक संच कंपनीचे मॅनेजर निखिल धुमाळ यांच्या प्रयत्नामुळे मिळाले. जुबिलियन फाउंडेशन निरा यांच्या वतीने शाळेची रंगरंगोटी,शाळेस ई लर्निंग संच व इतर साहित्य देण्यात आले. जगदंबा दूध संस्थेचे चेअरमन गणेश जगताप यांनी शाळेतील मुलांना क्रीडा साहित्य व शाळेचा बोर्ड दिला. समस्त ग्रामस्थ कोळी वस्ती यांच्याकडून गुरुजन सुभाष दगडे व विद्या भोसले यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
COMMENTS