Big Breaking l बालवडीतील स्मशानभूमीत जळत्या चितेवरून मृतदेह खाली ओढला : एकावर गुन्हा दाखल, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी भागातील बालवडी ता.भोर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी झालेल्या वयस्कर आजींचा मृतदेह जमिनीच्या वादातून स्मशानभूमी बाहेर फेकून देण्याची संतापजनक घटना रविवार दि.२४ सायंकाळी घडली.याप्रकरणी भोर पोलिसात नेरे ता.भोर येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद अक्षय विजय किंद्रे रा.बालवडी याने दिली.
       भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालवडी 
 येथील स्मशानभूमीत ताराबाई आनंदा किंद्रे वय - ८० यांचा अंत्यविधी करण्यात आला होता.अंत्यविधी उरकून ग्रामस्थ तसेच आप्तेष्ट घरी गेल्यानंतर काही वेळाने आरोपी प्रकाश सदुभाऊ बढे वय - ४५ रा.नेरे याने प्रेतास अग्नी दिलेली लाकडे बाजूला काढून अर्धवट जळालेले प्रेत जमिनीच्या वादापायी स्मशानभूमी बाहेर लाकडांनी ढकलून देऊन कठड्याखाली फेकले.अर्धवट जळालेल्या प्रेताची विटंबना केली गेल्याने नेरे - बालवडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.काही वेळातच घटनास्थळी मोठा जमाव झाल्याने जमावाकडून आरोपीस मारहाण करून जखमी करण्यात आले.तात्काळ आरोपीला खाजगी रुग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले आहे.घटनास्थळी जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे,उपनिरीक्षक अनिल चव्हाण,हवालदार उद्धव गायकवाड,विकास लगस,हेमंत भिलारे,अभय बर्गे,अजय साळुंखे उपस्थित होते.
--------------
जमावाकडून हॉटेलची जाळपोळ
आरोपी प्रकाश बढे यांच्या हॉटेल जमावाकडून जाळण्यात आले.यामध्ये हॉटेलमधील धान्य,कपडे,अन्य वस्तू तसेच हॉटेल शेजारील पाण्याच्या मोटरची केबल जळून पूर्णपणे खाक झाली.आग आटोक्यात आणण्यासाठी भोर नगरपरिषदकडून तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली. तर महावितरणचे कर्मचारी प्रफुल्ल शेटे व वैभव कुंभार यांनी पुढील मोठा अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला.हॉटेलच्या जाळपोळीत आरोपी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

To Top