जावली l आपण निवडून दिलेला उमेदवार दिल्लीला तर गेला पाहिजे... आणि गेला तर तो घरातून बाहेर पडला पाहिजे : जयवंत पाटलांची उदयनराजेंवर टीका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मेढा ते केळघर भव्य रॅली काढून केळघर येथे माजी मंत्री जयंत पाटील, लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिव सपकाळ यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. 
          केळघर येथिल समर्थ मंगल कार्यालयात शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. सदाशिव सपकाळ , सारंग पाटील, डॉ. भारत पाटणकर, सुहास गिरी, दिपक पवार, मोहनराव शिंदे, बापुराव पार्टे , समिंद्रा जाधव, श्रीमती भिसे, राजु जाधव आदी उपस्थित होते.
          यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टिका करताना आपण निवडून दिलेला दिल्लीला तर गेला पाहिजे आणि गेला तर तो घरातून बाहेर पडला पाहिजे. तो संसदेत तर गेला पाहिजे अन जर तो दुसरीकडे गेला तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित करून काम करणारा असा माणूस तुमच्या हक्काचा शशिकांत शिंदे संसदेत आवाज उठविणारा खासदार हवा असे सांगुन तुतारी समोरील बटन दाबुन मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन केले.
        पाटील पूढे म्हणाले पवार साहेबांना माणणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजपचे काही चालणार नाही तर उध्दव ठाकरे शिवसेना गट, शरद पवार राष्ट्रवादी गट, कॉग्रेस व घटकपक्ष यांचेच उमेदवार निवडून येतील असे सांगुन बाळासाहेबांची शिवसेना मोठा पक्ष फोडण्याच काम केल तर शरद पवार आपल्याला अडथळा म्हणून त्यांचा ही पक्ष फोडल्याची टिका जयंत पाटील यांनी केली.
       यावेळी लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी याच भुमितुन मी आमदार झालो याच भुमीतुन मी मंत्री झालो आणि याच भुमीतुन मला खासदार होण्याचा इतिहास घडणार असल्याचे भाकीत बोलून दाखविले. जनतेचा पूर्ण विश्वास पवार साहेबांच्या वर आहे. तुमच्या जावलीच्या सुपूत्राला खासदारकीची संधी मिळाली आहे त्यामुळे नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान माणसाने वागविलेल्या तुतारीला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         माजी आ. सदाशिव भाऊ सपकाळ यांनी जावलीची जनता शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी असून पूर्णपणे जावलीच्या जनतेचे मतदान आपल्यालाच होईल असा विश्वास दिला.
          यावेळी सायगाव, मोरघर, हुमगाव आदी भागातुन लोक सभेला उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सभापती बापूराव पार्टे यांनी केले.
To Top