सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील आसरे येथे धोम धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पितापुत्राचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) असे मृत्यू झालेल्या पितापुत्राचे नाव आहे.महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमचे शोध कार्य करून दोघाचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दोघांच्या मृत्यूमुळे आसरे गावावर शोक कळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील धोम धरणाच्या कालवा आसरे गावातून पुढे डोंगरातून बोगद्यातून पलीकडे खंडाळा तालुक्यात जातो. याच कालव्यात मंगळवारी दुपारी उत्तम ढवळे आणि सहदेव ढवळे हे पिता पुत्र पोहायला गेले होते. त्याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. याची माहिती स्थानिकाना मिळताच त्यांनी अगोदर शोध घेतला परंतु त्या दोघांना पाण्यातून अवघड ठिकाणी बुडाले असल्याने शोधणे कठीण बनले होते. त्यामुळे स्थानिकांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स यांना मदतीला बोलवले. त्यांनी शोध कार्य सुरू केले. याच दरम्यान, या शोध मोहीमेतील सदस्य अशुतोष शिंदे (वाई )यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी ढवळे पिता पुत्रांचे मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले होते. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
COMMENTS