सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (मळशी) ता. बारामती येथील नवीन तुळशीराम काकडे यांचे काल रात्री अपघाती निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते.
नवीन काकडे हे पुणे येथील वडगाव मावळ येथे पारले जी बिस्कुट या कंपनीत काम करत होते. काल रात्री दि. ३१ रोजी कामावरून सुटल्यानंतर रात्री साडेदहा वाजता पुणे-मुंबई जुना हायवेवर त्यांना अज्ञान वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना जवळीलच दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चयात आई, पत्नी, भाऊ दोन मुले असा परिवार आहे. अंत्यविधी दि. १ रोजी सकाळी ११ वाजता वाणेवाडी- मळशी येथे करण्यात येईल.