Bhor Breaking l संतोष म्हस्के l भोर मार्गे वरंधा घाट रस्ताने महाडला जाताय..तर सावधान ! वाघजाई मंदिरासमोरील घाटातला रस्ता खचला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात महत्त्वाच्या वाघजाई मंदिरासमोरच दरीच्या बाजूला  रस्त्याच्या कठड्याचा काही भाग बुधवार दि.१९ खचल्याने वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
      वरंधाघाट ता.भोर रस्त्यावर दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून धुके मोठ्या प्रमाणावर आहे.आहे.अजून मोठा पाऊस झाला नसताना रस्त्याचा काही भाग खोल दरीच्या बाजूला खचला गेला आहे.ऐन पावसाळ्यात या रस्त्याची बिकट परिस्थिती होण्याची चिन्हे आहेत.संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळाची माहिती घेऊन खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे.
To Top