दौंड तालुक्यात ब्लेक बेल्ट परिक्षा व पदवी प्रदान सोहळा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र संचालनालय पुणे  युवा व खेल मंत्रालय भारत सरकार संलग्नता प्राप्त आणि महाराष्ट्र शासन मान्य प्राप्त  ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन (मुलगी वाचवा देश वाचवा ) च्या ब्लॅक बेल्ट परीक्षा संपन्न दिनांक 15 व 16 जून 2024 रोजी शेरू अॅग्रो टुरिझम यवत या ठिकाणी महाराष्ट्र शासन मान्य ब्लॅक बेल्ट परीक्षा संपन्न झाल्या. 
               यामध्ये स्वराज सचिन शिंदे, मनवा ऊमेश पासलकर, आरुष सुनिल माने , कुणाल गुलाब पडवळ, अनिरुद्ध भाऊसो बारवकर , भोजराज राजाराम जामकर , आरती  भाऊसो बारवकर, अपेक्षा राजेंद्र मोरे व संस्कृती गुलाब पडवळ या विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा देऊन ब्लॅक बेल्ट संपादन केला .या मुलांचे मुख्य प्रशिक्षक व संस्थेचे अध्यक्ष  मा.अवधूत चिलवंत सर (ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाऊंडेशन ) आदित्य बारवकर (प्रशिक्षक - ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन) सुभाष नारायण फासगे सर ( 5 Dan Black Belt ) सेनसाई - इंडियन कराटे टायक्वॉंदो फेडरेशन पुणे व कुमारी सिद्धी जामकर हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  वसंत पाटील साहेब (न्यायाधीश - जलदगती न्यायालय मुंबई)  मोसिन पठाण सर (सेल्फ हिप्नॉसिस यवत) हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन  सुनील माने (क्रीडा विभाग प्रमुख ऑल मार्शल आर्ट एज्युकेशन फाउंडेशन) यांनी केले.तसेच कार्यक्रमाची सांगता संस्थेचे अध्यक्ष अवधुत दिगंबर चिलवंत यांनी आभार व्यक्त केले.
To Top