jawali News l जावली बँकेच्या संचालकांनी बँकेचा कारभार सार्थ करून दाखविला : आ. शशिकांत शिंदे : जावली बँकेला साडेआठ कोटीचा नफा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
कोरोना काळापासून जावली बॅक तोट्यात गेल्याने  बॅक अडचणीत आली परंतु आपण सर्वांनी बॅक बिनविरोध करून ज्या विश्वासाने विक्रम भिलारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात बॅकेचा कारभार दिला तो त्यांनी सार्थ करून दाखवित बॅक साडे आठ कोटीच्या नफ्या जवळ आणून ठेवली आणि म्हणूनच आज आपण आनंदाच्या वातावरणात सभा संपन्न करतोय असे गौरोद्गार आ. शशिकांत शिंदे यांनी काढले.
           दत्तात्रय महाराज कळंबे बॅकेची ५१ वी वार्षीक सभा दादर येथिल डॉ. डिसुझा हायस्कूल मध्ये संपन्न झाली. यावेळी विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बॅकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, माजी उपसभापती सौरभ शिंदे, वाशी महानगर पालीकेचे उपायुक्त विष्णु धनावडे आणि बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.        
           प्रारंभी हभप दत्तात्रय महाराज कळंबे व  भिलारे गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यात येवून   दिवंगत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी मागील दोन तीन वर्षे आम्ही उपस्थित नसल्याची खंत व्यक्त करून ज्या हेतुने सर्वसामान्य जनतेची असणारी बॅक महाराजांनी सुरु केली ती चांगल्या प्रकारे प्रगती करीत असल्यानेच सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. 
              यावेळी माजी आ. सदाशिव भाऊ सपकाळ यांनी जावली बॅक व प्रतापगड कारखाना हे जावलीच नाक आहे आणि ते मोडल तर योग्य नाही म्हणून ते टिकविण्या साठी शरद पवार साहेबांकडे वारंवार भेटी घेवून प्रयत्न केल्याचे सांगुन आम्ही मक्याच्या उत्पन्नावर प्रोजेक्ट तयार करणार होतो परंतु मला त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण करण्याचा राजकीय प्रयत्न झाला असला तरी तो प्रकल्प उभा करण्याचा अजुनही माझा माणस असल्याचे सपकाळ यांनी सांगुन महारांजांच्या विचाराची बॅक प्रगती पथावर नेणाऱ्या सर्व संचालकांचे त्यांनी अभिनंदन केले.
             वसंतराव मानकुमरे म्हणाले आपली जावली बॅक आता चंद्र सुर्य असेपर्यंत तोट्यात येणार नाही. कोणी भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाची माय नाही आणि डेरिंग पण होणार नाही. ही बॅक महारांजांच्या पुण्याईने चालली आहे आणि पुढील काळ चांगल्या पद्धत्तीने जावा असे आवाहन त्यांनी केले.
         ते पुढे म्हणाले भिलारे गुरुजींचे नातु म्हणून तुमच्या हातात कारभार दिला. कोणाचेही पैसे कोणाच्याही कडे जातात लोकांच्या तक्रारी आहेत . त्यामुळे बँकेला नविन टॅक्नॉलाजी वापरा जेणे करून असे प्रॉब्लम येणार नाहीत असे सांगुन मानकुमरे पुढे म्हणाले  तुम्ही घाबरू नका चांगले सक्षम निर्णय घ्या. बॅकेमध्ये नोकर भरती करताना कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही. निपक्षपणे नोकर भरती करा. शिपाई सुद्धा १२वी झालेला असावा तरच बॅक चांगल्या प्रकारे प्रगती करेल असे वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.
           शिंदे साहेब तुमच्यावर पवार साहेबांच खुप प्रेम आहे तुमची ताकद वाढली आहे. जर तुमच सरकार आल तर तुम्ही मंत्री होणार पण आमचच सरकार राहणार अस बोलून पवार साहेबांचा पुतण्या पवार साहेबांबरोबर राहीला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर काही बोलायच नाही सगळ्या भानगडी झाल्यात. महाराष्ट्र पेटून उठलाय असो असे सांगुन आपली बॅक वाचविण्यासाठी विशेष करून आ. मकरंद आबांनी महत्वाची  मदत करून शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहील्याने बॅक बिनविरोध झाली. त्यामुळे आबांचे विशेष  आभार मानावे लागतील  असे मानकुमरे यांनी सांगीतले.

            माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी डीएमके बॅकेच्या प्रगतीत महत्वाची भूमीका पार पाडीत बॅक बिनविरोध केल्यानेच आज बॅकेला साठेआठ कोटीचा नफा मिळाला असून ईथुन पुढे बँकेच्या आर्थिक उन्नती साठी बॅक बिनविरोध ठेवण्याची परंपरा अखंडीत ठेवावी अशी सर्व सभासदांनी मागणी करून बॅक नफ्यात आणल्या बद्दल सर्व संचालकांचे व कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. तसेच बॅकेने सभासदांना लाभांश वाटप करण्याची मागणी करण्यात आली. 
            यावेळी बॅकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांनी बॅकेच्या प्रगती विषयी माहिती दिली. तसेच बँकेचा अहवाल वाचन करण्यात येवुन सर्व उपस्थित सभासदांनी त्याला बहुमताने मंजुरी दिली. व्हाईस चेअरमन चंद्रकात दळवी यांनी सर्वांचे आभार मानले. 

चौकट - शिंदे साहेब तुम्ही हरला आम्हाला रात्रभर झोप लागली नाही आम्ही थमसप पित बसलो खुप दुःख झाल पण आम्ही कार्यकर्त्यांना मोकळ ठेवल होत जावलीला संधी मिळाली होती तुम्ही खासदार झाला पाहीजे होता मीही दोन वेळा खासदारकी लढवली होती - वसंतराव मानकुमरे
-------------------
 वसंतराव शेवाळ्या सारखे आहेत ते हातात घावत नाहीत. माझे आता खुप वजन वाढले आहे. सदाभाऊंना विधानसभेचे तिकीट दिल तर काम कराल का? असा प्रश्न वसंतरावांना करीत आ. शिंदेंनी वसंतरावांना आमदारकीची ऑफर करीत आमच्याकडे या असे सांगुन आमच्या बरोबर असता तर खुप मोठे झाला असता अशी आठवण आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी करून दिली.

To Top