जावली l ओंकार साखरे l मेढ्या नगरपंचायत असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी : लोक प्रतिनिधींची ठेकेदारावर मेहरबानी : एस. एस. पार्टेची टिका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी स्मशान भुमीची वाणवा असून पाणी , लाईट अशा अनेक समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागत असताना विकासाच्या व शुभोभिकरणाच्या नावाखाली ठेकेदारांच्यावर मेहेरबान असणाऱ्या स्थानिक लोक प्रतिनिधींनी जनतेच्या निगडीत प्रश्नांकडे लक्ष देवुन ते सोडवावेत अशी मागणी उबाठा शिवसेनेचे नेते एस एस पार्टे यांनी केली आहे.
          मेढा येथिल कार्यालयात बोलताना एस एस पार्टे म्हणाले की, ग्रामपंचायत असताना लोकांच्या समस्याचा विचार करून स्वतः दोन लाखाचा निधी स्मशान भुमी व मुतारी साठी एक लाख असा निधी दिला होता. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले परंतु आज पर्यंत ना स्मशान भुमीचा प्रश्न मिटला ना मुतारीचा प्रश्न मिटला तर दोन गुंटे जागा पाण्याच्या टाकीला देवुन पाण्याच्या टाकीचा ठिकाणा नाही असे सांगुन पार्टे गुरुजी म्हणाले. लोक प्रतिनिधी मेढा नगरीच्या शुशोभिकरणाकडे लक्ष देतात परंतु समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
           नगर पंचायतीचा पहिला सेनेचा तर दुसरा भाजप चा नगराध्यक्ष झाला परंतु त्यांनी टाळाटाळ केली. लोक प्रतिनिधी सह नगरसेवकांनी स्मशान भुमी व मुतारी अशा महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. शुशोभिकरणाकडे लक्ष देवुन स्थानिकांच्या उरावर कर बसविण्याचा ठराव केला त्यामुळे सामान्य जनता होरपळून गेली असल्याची भावना पार्टे यांनी व्यक्त केली.  
            तालुक्याचे आमदार गेले पंधरा वर्षा पासुन एकहाती कारभार करतात. परंतु त्यांना असे सांगायचे आहे की तुम्ही राजे आहात . पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात लोकांना कोणती अडचण राजे येवुन देत नव्हते. तुम्ही राजे आहात पण आता तुम्ही लोक प्रतिनिधी आहात इथुन पुढे तरी चांगले काम करावे असे सांगुन निव्वळ गोड बोलून आपले कॉन्ट्रक्टर जगविण्यासाठी किंवा आपल्या हितचिंतकाचे बघु नये तर तालुक्यातील समस्याकडे लक्ष द्यावे असे पार्टे गुरुजी म्हणाले.
            ते पुढे म्हणाले शाळा सुरू होत असून पावसाळा सुरु आहे त्यामुळे गळणाऱ्या शाळांकडे तसे लाईटकडे लक्ष द्यावे. पुनवडी पुला संदर्भात बोलताना आम्ही पाठपुरावा करून निधी आणला हे आम्ही ठामपणे सांगु शकतो परंतु  समोर मात्र केल नसल तरी आम्हीच केल अस ओरडून सांगत आहे असे पार्टे यांनी सांगितले. 
            तालुक्यात तलाठयांना बसायला कार्यालय नाही कुठे तरी बसतात तेथे पाठीही लावली जात नाही त्यामुळे सामान्य जनतेची ससेहोलपट होत आहे. शाळा सुरू होत आहेत मुलांना विविध दाखल्यांची गरज असते त्यामुळे त्यांना बसण्यासाठी एखादे कार्यालय असावे असेही पार्टे गुरुजी यांनी सांगीतले.
         तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. काम करणारे ठेकेदार यांचेच आहेत. आवाज उठविणारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असतो असे सांगुन आमदारांनी कॉन्ट्रक्टर जगविण्याचा निव्वळ प्रयत्न करु नये असे सांगताना अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने मार्फत आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी उबाठा शिवसेनेचे नेते एस एस पार्टे यांनी दिला.
To Top