सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे
बँकेच्या अधिकाऱ्यांचे ग्राहकांशी संबंध कसे असावे व त्यांची कामे कशा पद्धतीने मार्गी लावावीत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सायगाव चे शाखाप्रमुख मिलिंद मगदूम यांनी दाखवून दिले आहे .असे गौरवोदगार जावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर यांनी काढले .
सायगांव ता .जावली येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा सायगावचे शाखाधिकारी मिलिंद मगदूम यांचा ग्राहकांच्यावतीने घेण्यात आलेल्या निरोप समारंभावेळी ते बोलत होते, याप्रसंगी प्रगतशील शेतकरी जितेंद्र कदम, उद्योजक संजय जेधे, खर्शी तर्फे कुडाळ गावचे पोलीस पाटील सुहास भोसले, जावळी तालुका पत्रकार संघाचे सचिव धनंजय गोरे,सामाजिक कार्यकर्ते, निलेश गायकवाड,किशोर देशमाने, माजी सैनिक दीपक जेधे योगेश जेधे यांच्यासह व्यापारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत भावनिक वातावरणात झालेल्या या निरोप समारंभावेळी पुढे बोलताना प्रशांत गुजर म्हणाले,एक आदर्श मदत करणारा कर्तव्यदक्ष अधिकारी या शाखेला मिळाल्यामुळे शेतकरी व व्यवसायिक तसेच बचत गटाच्या महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने या विभागातील अनेक ग्राहक बँकेला जोडले गेले,
सुहास भोसले बोलताना म्हणाले, अनेक युवा उद्योजकांना मार्गदर्शन करून बँकेच्या योजनाची माहिती देऊन मेळावे घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा दिली, त्यामुळे असे अधिकारी मिळाल्याने नक्कीच बँकेबद्दल प्रेम वाढले आहे,
जितेंद्र कदम बोलताना म्हणाले, आपल्या कामावर प्रामाणिकपणे कामावर श्रद्धा ठेवणाऱ्या आशा अधिकाऱ्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजेत.
मिलिंद मगदूम साहेब बोलताना म्हणाले, शाखाप्रमुख म्हणून माझी सायगाव येथे पहिलीच पोस्टिंग मिळाली खूप दडपण होते पण इथल्या लोकांचे प्रेम पाहिल्यावर मला जर निवृत्ती पर्यत जरी येथे काम करण्यास सांगितले तरीही मी करू शकतो,
यावेळी ग्राहकांच्या वतीने मगदूम साहेबाना शाल श्रीफळ व फोटो फ्रेम देऊन स्वागत करण्यात आले व अत्यंत भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.
यावेळी संतोष सांवत प्रमोद दीक्षित, रविंद्र सोनटक्के, अनिल मोरे, वैभव शितोळे,हणमंत जकाती, संतोष यादव, सागर पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .