जावली l अजिंक्यतारा-प्रतापगडचा आगामी हंगाम यशस्वी करणार : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : धनंजय गोरे 
साखर कारखानदारीत ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी यंत्रणा हे दोन घटक महत्वाचे असून हे दोन घटक असल्याशिवाय कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नाही, तसेच कारखान्याचे आगामी 2024-25 गळीत हंगामाकरीता प्रतापगड कारखान्याकडे 4143 हेक्टर आर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून अधिक नोंदीसाठी सर्वांचे प्रयत्न सूरू आहेत, आगामी हंगामात विक्रमी गाळप व अत्युत्तम साखर उतारा काढण्याचा दोन्ही संचालक मंडळाचा मनोदय असून, गतवर्षी प्रमाणेच याहीवर्षी कारखान्याकडे नोंद केलेला सर्वचा सर्व ऊस सभासदांनी गाळपास पुरवून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करावा असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक व सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना केले. 

     अजिंक्य - प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या वतीने प्रतापगड कारखान्याच्या 2024-25 या गळित हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाची तोडणी व वाहतुक वेळेत होण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ सोनगाव ता. जावली येथील प्रतापगड साखर कारखाना कार्यस्थळावर सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे व अजिंक्यतारा 
कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे आणि दोन्ही संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होते.  प्राथमिक स्वरूपात नारायण शिंदे, संजय तरडे, पांडुरंग तरडे, लक्ष्णम पवार, संदिप जाधव, शामराव शिवथरे, विशाल शिंदे, नथुराम चिकणे, विराज पिसाळ, प्रदिप पवार, प्रमोद कचरे, या ऊस तोडणी कंत्राटदारांनी आपला तोडणी वाहतुक करार केला. 
       यावेळी प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे उपाध्यक्ष नामदेव सावांत यांच्यासह दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे बोलताना म्हणाले,अजिंक्यतारा व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने साडे तीन लाख टनाचे यशस्वी गाळप करून गतवषीचा पहिलाच हंगाम यशस्वी केला होता, यावर्षी दुष्काळी परिस्थीतीमुळे उसाचे प्रमाण काहीसे घटले आहे, मात्र तरीसुध्दा संचालक मंडळाच्या कार्यतत्परतेमुळे व सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे 2024-25 चे गळीत हंगामाची पूर्व तयारी जोमाने सुरू केलेली असून गळीत 
हंगामाची सुरूवात निर्धारीत वेळेत होण्याच्या दृष्टीने मशिनरी देखभाल- दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. येणाऱ्या हंगामाकरीता कारखान्याने आतापासूनच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करारबध्द करण्याचे काम सुरू केलेले आहे. 
      त्याचा शुभारंभ म्हणून आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. कारखान्याच्या अडचणीच्या काळात कारखान्याप्रती दाखविलेला विश्वास असाच यापुढील काळातही दाखवुन येणारा गळित हंगाम पुर्ण क्षमतेने  चालविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सैारभ शिंदे यांनी यावेळी केले.यावेळी सर्व संचालकांसह सभासद, वाहतूक संस्था संचालक, शेती अधिकारी, तोडणी वाहतूक मुकादम उपस्थित 
होते.
To Top