सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वराच्या श्रावणी यात्रेनिमित्त चौधरवाडी येथे सुनेत्रा अजित पवार 'खासदार केसरी' हे मैदान आयोजित केले आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडी जोडीने सहभाग नोंदवला आहे.
ज्या बैलगाडी गाडी मालकांना सहभाग नोंदवायचा आहे. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपली नोंद करायची आहे. शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या बैलगाडीचे आज संध्याकाळी ८ वाजता लॉट काढले जाणार आहेत.
खासदार केसरी साठी पहिले बक्षीस १ ००,००० रुपये, दुसरे बक्षीस ७५०००, तिसरे बक्षीस ५१०००, चौथे बक्षीस ३१०००, पाचवे बक्षीस २१०००, सहावे बक्षीस १५०००, सातवे बक्षीस ११०००, आठवे बक्षीस १०,००० या बक्षिसांबरोबरच प्रत्येक नंबरसाठी २ ढालीनचे सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. या बैलगाडी शर्यतीचे आयोजन संग्राम सोरटे व ऋषी गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS