सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील वेळवंड ता.भोर येथील शेतकरी तानाजी तुकाराम पांगुळ खाजगी रानात जनावरे चारण्यासाठी बुधवार दि.२८ गेले होते.मात्र अतिवृष्टी तसेच वाऱ्याच्या जोरामुळे जनावरे विद्युत वाहक तारा जनावरे चरणाऱ्या खाजगी रानात तुटून पडल्या होत्या.या विद्युत वाहकतारांचा जोरदार धक्का तीन म्हशींना बसल्याने म्हशी जागीच ठार झाल्या. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
नेहमीप्रमाणे शेतकरी तानाजी पांगुळ जनावरे चारण्यासाठी दुपारच्या वेळी घेऊन गेले होते.पांगुळ यांच्या चारिव रानातून विद्युत वाहक तारा गेल्या होत्या.या विद्युत वाहक तारा जोरदार वाऱ्याने तुटून जमिनीवर पडल्या होत्या.या तारांचा शॉक चरणाऱ्या तीन म्हशींना जोरदार बसला.म्हशींना वाचवण्यासाठी शेतकरी पांगुळ यांनी ग्रामस्थ दत्ता मोरे,जगदीश बैलकर ,रामभाऊ दिघे, रवींद्र पांगुळ यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी पोहचून म्हशींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला.मात्र दुर्दैवाने तीन म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
-------------------
दोन म्हशी गाभण
वेळवंड येथील विजेच्या धक्क्यातील मृत पावलेल्या म्हशींमध्ये दोन म्हशी गाभण असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.यामुळे शेतकऱ्याचे दीड लाखाच्या पुढे नुकसान झाले आहे.दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी वेलवंड खोऱ्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
COMMENTS