सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
सोनगाव ता. जावली येथिल अजिंक्यतारा प्रतापगड उद्योगास उस तोडणी करण्याकरीता मजुर व वाहतुकी करीता वाहणे पुरवितो असे सांगुन फसवणूक करणारा संशयीत आरोपी तानाजी आनंदराव गावडे राहणार खांडज, ता. बारामती, जिल्हा पुणे यास सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्या पथकाने अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी मिळाली असल्याची माहिती देण्यात आली.
कारखान्याकरिता ऊस तोडणी मजूर व वाहतुकीकरता वाहने पुरवणे बाबत करार करून सदर कराराप्रमाणे वाहने व मजूर न पुरवता कारखान्याकडून १२ लाख रू ची उचल घेऊन कारखान्याची फसवणूक केली असलेबाबत उप शेती अधिकारी लालसिंग ज्ञानदेव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांच्या पथकाने मिळालेल्या माहिती नुसार तानाजी आनंदराव गावडे रा. खांडज ता.बारामती जिल्हा पुणे येथून सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनी पाटील व पो.ना.कचरे,पो. कॉस्टेबल इंगवले यांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.