Purandar News l छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी पुरंदर तालुक्यातून हजारो दिव्यांग बांधव रवाना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेने विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. 
या मोर्चासाठी पुणे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातून दहा हजार दिव्यांग बांधव या मोर्चासाठी रवाना झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील निरा व निरा पंचक्रोशी येथून दोन हजार महिला व पुरुषदिव्यांग बांधव या मोर्चासाठी  सहभागी झाले आहेत. प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली हे दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहेत. यावेळी बोलताना मंगेश ढमाळ यांनी सांगितले की दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन चालू करावी, दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतने एक गुंठा जागा घरकुलासाठी द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळावे तसेच विधानसभा व लोकसभा या ठिकाणी दिव्यांगांना राखीव जागा असाव्यात अशा विविध मागण्यासाठी आ. बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चासाठी दिव्यांग बांधव उपस्थित राहणार आहेत.
To Top