सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील मंगळवार पेठेतील श्रीमंत श्री सार्वजनिक गणेश मंडळ व उन्नती महिला प्रतिष्ठान भोर यांच्या वतीने मंडळाच्या गणेश मूर्ती समोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब भोर राजगड यांच्या तर्फे शेकडो महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमस्थळी पोलीस उपनिरीक्षक शिला खोत,रोटरी क्लब अध्यक्षा डॉ.रूपाली म्हेत्रे, उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सीमा तनपुरे यांचे हस्ते महाआरती करण्यात आली.प्रीती शहा व मधुरा पैठणकर यांनी अथर्वशीर्ष पठण केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधिर धुमाळ,हवालदार हेमंत भिलारे,सोनाली इंगुळकर,रेखा धरु, सुजाता धुमाळ, सुप्रिया धरु, स्नेहा धरु, राजेश्री रावळ, नंदाताई जाधव तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार संतोष म्हस्के, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विलास मादगुडे व मंडळाचे सभासद उपस्थित होते.या कार्यक्रमाला आमदार संग्राम थोपटे, पोलिस निरीक्षक आण्णा पवार,भोर नगरपालिकेचे माजी नगरसेवक यांनी भेट दिली.