वेल्हे l ड्रीमलॅण्ड स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात साजरी : चिमुकल्या कडून विविध संदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंती निमित्त राजगड तालुक्यातील विश्र्वा फाऊंडेशन चे ड्रीमलॅण्ड स्कूल मध्ये विविध उपक्रांद्वारे साजरी करण्यात आली. यावेळी येथील मुलांनी महात्मा गांधीजीची वेशभूषा केली होती. तर मुलांनी महात्मा गांधी यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. 
          पथनाट्य सादर करून बुरा मत देखो, बूरा मत बोलो, बूरा मत सूनो, असा संदेश दिला. तसेच अहिंसा करू नका, नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा, असे मत संस्थेच्या संचालिका सुप्रिया दसवडकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षिका भाग्यश्री वाघमोडे, नसरीन तांबोळी, राणी दिघे, स्वाती शेंडकर, मनोज पंडीत, रंजना देवगिरीकर, हर्षदा देशपांडे, मिनल रणखांबे, रेश्मा कांबळे, साक्षी हांडे, ऋतूजा येनपुरे, रोशनी कांबळे, आदी सह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा देशपांडे यांनी केले तर आभार नसरीन तांबोळी यांनी मानले.
To Top