सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
राज्य लोकसेवा आयोगाने 2023 साली घेतलेल्या परीक्षेमध्ये पिंपळे(ता.पुरंदर) येथील आशिष विठ्ठल खेनट हे राज्यामध्ये पंधरावी रँक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना डी वाय एस पी पदावरती काम करण्याची संधी मिळणार आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन जिद्दीच्या आणि सातत्याच्या जोरावरती त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा पोरगा साहेब झाला अशी भावना ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. खेनट यांचे वडील विठ्ठल नारायण खेनट यांनी शेती व्यवसाय सांभाळत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करून समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. एक मुलगा अमोल विठ्ठल खेनट हे मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर दुसरे चिरंजीव डी वाय एस पी पदावरती काम करणार आहेत. त्यामुळे विठ्ठल खेनट यांची छाती अभिमानाने फुगून आली आहे. दोन्ही मुलांचे हे यश पाहून आई वडिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटत आहे.
मुलाचे हे यश पाहून खेनट यांच्या आई शालन खेनट यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही. तसेच खेनट यांचे मामा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य योगेशनाना फडतरे,संजय फडतरे ,विजय फडतरे तसेच आबा मोकाशी यांनीही त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
तसेच आबा मोकाशी मित्रपरिवार पुरंदर तालुका यांच्यावतीने आशिष खेनट यांना मिळालेल्या घवघवीत यशासाठी व त्यांच्या मेहनतीसाठी अभिनंदनचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाणे महानगरपालिका अंतर्गत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन घेऊन नियोजनपूर्वक अभ्यास केला. त्यामुळेच मला हे यश संपादन करता आले तसेच मला मिळालेल्या संधीचे मी लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने सोने करणार आहे व माझ्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर, निष्पक्ष, निस्वार्थ प्रयत्न करणार आहे असे आशिष खेनट यांनी यावेळी पुणे वैभवशी बोलताना सांगितले.
----------------------
आबा मोकाशी मित्रपरिवार पुरंदर तालुका यांच्यावतीने आशिष खेनट यांना मिळालेल्या घवघवीत यशासाठी व त्यांच्या मेहनतीसाठी अभिनंदनचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आमचा भाचा आशिष खेनट ह्याने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तो सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आपल्या पदा द्वारे त्यांच्या समस्या व प्रश्न संकटे सोडवेल असा विश्वास आबा बाळकृष्ण मोकाशी ह्यांनी व्यक्त केला.
COMMENTS