Pune Crime l पुण्यात कोयता गग पुन्हा सक्रिय : भरदिवसा एकाला सपासप वार करत संपवलं

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी 
कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. 
        सतीश थोपटे  (रा. कोल्हेवाडी, खडकवासला ) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
      याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
To Top