Pune News l 'सोमेश्वर'चा देशपातळीवर नावलौकिक : सहवीजनिर्मिती प्रकल्पाला 'बेस्ट को-जनरेशन प्लांट' पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उद्योगात राज्यात नावलौकिक आहे. मागील हंगामात सोमेश्वर कारखान्याने गत वर्षीच्या ऊसाला राज्यात जादा दर दिला आहे. आता सोमेश्वर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाने देशपातळीवरील पुरस्कारावर आपली मोहर उमटवली असून देशातील सहकरी सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून 'बेस्ट को-जनरेशन प्लांट' चा पुरस्कार पटकावला आहे. ११ किंवा २५ जानेवारी रोजी हा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 
         या पुरस्कारासाठी दोन वर्गवारी करण्यात आल्या असून यामध्ये सहकारी व खाजगी अशा वर्गवाऱ्या करण्यात आल्या असून यामध्ये सहकारी वर्गवारीत को-जनरेशन प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला आहे. ३६ मेगावॅट क्षमता असलेल्या प्रकल्पातून ८०   केजी पेक्षा जास्त प्रेशर तसेच मागील तीन वर्षाची वीजनिर्मिती आणि वीजविक्री सरासरी सर्वात जास्त असल्याने सोमेश्वर ने हा पुरस्कार मिळवला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
To Top