Velhe Breaking l मिनल कांबळे l राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची तपासणी.. ११ शिक्षक गैरहजर : शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे यांनी शनिवारी अचानक भेट दिली. अचानक भेट दिल्यांने तालुक्यातील ११ शिक्षक गैरहजर होते. या शिक्षकांना दोन केंद्र प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
        पासली व नाळवट येथील शाळेस देखील नाईकवडे यांनी भेट दिल्यानंतर या शाळेचे कौतुक केल्यांची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आर.आर.बामणे  यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना गटशिक्षणाधिकारी  आर.आर.बामणे म्हणाले कि राजगड तालुक्यात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे यांनी शनिवारी अचानक भेट दिली.शनिवारी सकाळी लवकर शाळा भरते परंतु विद्यार्थी शाळेत आले होते परंतु यावेळी करंजावणे व अडवली येथे एकही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते.शिक्षकांच्या अनुपस्थितीत  येथील विद्यार्थ्यांशी शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे यांनी संवाद साधला असता शैक्षणिक प्रगतीबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केले,तसेच मुलांना योगा,कवायत,येत नव्हती, शालेय उपक्रमाच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या नव्हत्या,शाळेचा परिसर देखील अस्वच्छ दिसुन आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाकडुन मांगदरी केंद्रप्रमुख शकील मुल्ला व मार्गासनीं केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रज्ञा बांदल व 
अडवली येथील उपशिक्षक तिकोणे बसंती रामचंद्र,मोरे कल्याणी नथु,सापते शितल यशपाल,गवळी देविदास यशवंत,सोनवणे स्वाती बाळासो,जाधव योगिता उत्तम,तर करंजावणे शाळेतील मुख्याध्यापक रांजणे रोहीदास दत्तु,उपशिक्षक सय्यद निगार युसुफअली,बांगर आशा गुरुदास,गजधने जयश्री रघुनाथ,काळे शहाबाई भानुदास,यांना कारणे दाखला नोटीस काढण्यात आले असल्याचे सांगितले,
            तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातुर्डेवाडी,पासली व नाळवट शाळेस देखील शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे यांनी भेट दिली.यावेळी येथील शाळेची स्वच्छता व उत्साही शिक्षक पाहुन 
शिक्षणाधिकारी भारावुन गेले,येथील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला शैक्षणिक प्रगतीबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.व येथील शिक्षकां सोबत शैक्षणिक प्रगती चर्चा करुन काही गोष्टीबाबत शिक्षकांना सुचना देऊन मार्गदर्शन केले.
To Top