सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता. बारामती ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश विष्णू घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच गीतांजली जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.६) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपसरपंच पदासाठी रमेश विष्णू घाडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच सागर चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच दिग्विजय जगताप, ग्रामसेवक विजय चव्हाण, सदस्य सतीश जगताप, रविराज जगताप, अजित भोसले, वनिता कोकरे, मंगल मुळीक, उजमा शिकीलकर, मयुरी पवार, सोनाली निकम, शारदा जाधव, वंदना चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वार्ड क्रमांक पाच मध्ये प्रथमच उपसरपंच पदाची संधी मिळाली असल्याने गोसावी समाजाने समाधान व्यक्त केले आहे.