Bhor Breaking l भोर-आंबाडे रस्त्यावरील अपघातात निरेच्या जेष्ठानंतर निळकंठच्या माजी सरपंचाचा उपचारादरम्यान मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर- आंबाडे मार्गावरील ता.भोर येथील वळणावर दोन दुचाकींचा समोरा समोर धडक होऊन नीरा ता. पुरंदर येथील चंद्रकांत लक्ष्मण जावळे यांचा मृत्यू झाला होता. यांच्या समवेत असणारे नेरे - निळकंठ ता. भोर येथील माजी सरपंच उत्तम गायकवाड गंभीर जखमी होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला.
     स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत लक्ष्मण जावळे वय -६० रा.नीरा ता. पुरंदर व दुसरा निळकंठ ता.भोर येथील माजी सरपंच उत्तम गायकवाड हे दोघे मांढरदेवी बाजूला टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी ज्युपिटर गाडीवर जात होते.तर दुसरा दुचाकीस्वार मांढरदेवीकडून भोरकडे जात असताना समोरासमोर दोन गाड्यांची धडक झाली.या अपघातात चंद्रकांत जावळे या ज्येष्ठाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरे गायकवाड गंभीर जखमी  होते .गायकवाड यांना उपचारासाठी भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र गायकवाड गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. शनिवार दि.१८ रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान पुणे येथे उत्तम गायकवाड यांचा मृत्यू झाला.

To Top