सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यात उजनी जलाशय परिसरात फ्लेमिंगोसह इतर 380 जातींच्या पक्षांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
कुंभारगाव, डिकसळ या ठिकाणी पक्षांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने पक्षीप्रेमी, पक्षी मित्र राज्यासह पर राज्यातून या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होत असल्याने पर्यटकांना ही मोठी पर्वणी प्राप्त झाली आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे कुंभारगाव हे उजनी जलाशया लगतचे महत्त्वाचे पक्षांचे केंद्र. या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षी असल्याने तसेच बोटिंगची व्यवस्था होत असल्याने अनेक पक्षप्रेमी या ठिकाणी येऊन पक्षी पाहण्याचा आनंद लुटत आहेत. उजनी जलाशयामध्ये फ्लेमिंगो पक्षासह, नॉर्द र सावलर, फलक गल, लिटिल टन, मिस्टर टन, कॅप्टन टन, प्रे, टेरीगन फाल्गुन, फाल्कन, के टेन कूल, यांसह 380 जातींच्या पक्ष्यांचे अस्तित्व या ठिकाणी आहे.
याबाबत आम्ही कुंभारगाव येथील उजनी पार्क चे मालक कुंडलिक धुमाळ यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, सत्य उजनी जलाशयामध्ये 380 जातींचे पक्ष आहेत. त्यामध्ये वॉटर बॉडी जातीचे 175 पक्षी, तर इतर पक्ष आहेत. आमच्या या ठिकाणी बोटीनचे व्यवस्था उपलब्ध असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी पक्षी पाहण्याचा आनंद घेतात. या ठिकाणी राज्यसह चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली, मुंबई येथून सुद्धा अनेक पर्यटक तसेच पक्षीप्रेमी, पक्षी मित्र येथील उजनीकाठच्या परिसरातील पक्षी पाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे त्यामुळे येथील पक्ष्यांचे सारंग गार मोठ्या प्रमाणात फुलले आहे. पक्षी पाण्याचा वेगळाच आनंद असतो, त्याचबरोबर बोटिंगची व्यवस्था उपलब्ध असल्याने अनेक पक्ष प्रेमींना ही पर्वणी प्राप्त झाली आहे. तसेच या ठिकाणी पर्यटकांना मासे सुद्धा खाण्यास मिळत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा या ठिकाणी लागला आहे.