सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : निलेश काशिद
लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधुमती सागर गालिंदे यांची तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच गणीभाई कच्छी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी कॉंग्रेस व भाजपा कडून दोन्ही पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले नाहीत.
आज लोणंद नगरपंचायत सभागृहात वाईचे प्रांत राजेंद्र कचरे, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व सर्कल यादव मॅडम यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कडून मधुमती पलंगे- गालिंदे यांचा एकमेव अर्ज सोमवारी दाखल करण्यात आलेला तर आज उपनराध्यक्ष पदासाठी गणीभाई कच्छी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. गणीभाई कच्छी यांचे नाव प्रभाग क्रमांक चौदाच्या नगरसेविका सुप्रिया गणेश शेळके यांनी सुचवले तर त्यांच्या नावाला भरतसाहेब शेळके-पाटील यांनी अनुमोदन दिले.
या विशेष सभेला सभागृहात नगरसेवक भरत शेळके, शिवाजीराव शेळके -पाटील ,रविंद्र क्षीरसागर, सचिन शेळके,भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, रशिदा इनामदार , दीपाली निलेश शेळके; तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, दिपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर प्रविण व्हावळ , आसिया बागवान, सागर शेळके आदी नगरसेवक उपस्थित होते.
दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली . यावेळी पोलीस बंदोबस्त सपोनि सुशिल भोसले यांनी ठेवला होता. नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे व उपनराध्यक्ष गणीभाई कच्छी यांचे मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील , ज्येष्ठ नेते मिलिंद दादा पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळेस सभागृहात लोणंद बाजार समिती सभापती प्रा. सुनिल शेळके , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात , शंकरराव क्षीरसागर, ॲड. गजेंद्र मुसळे, एन डी क्षीरसागर, बबनराव शेळके , राहुल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.