सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
रोजचे जीवन जगताना प्रत्येकाने एक छंद जोपासला पाहिजे, जो स्वतः बरोबरच इतरांनाही आनंद देईल. त्यामुळे आलेल्या ताण तणावातुन बाहेर पडण्यासाठी हास्यासारखे दुसरे औषध नाही असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यकारी अधिकारी बाबासाहेब खराडे यांनी केले.
सुपे (ता.बारामती) येथील जीवन साधना फाऊंडेशन संस्थेच्यावतीने प्राजक्ता विद्यालयाची प्रेरणा असलेल्या प्राजक्ता सुपेकर हिच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या ''प्राजक्ता'' व्याख्यानमालेत ' हसण्यासाठी जन्म आपुला ' या विषयावर दुसरे पुष्प खराडे यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. खराडे यांनी सादर केलेल्या शेरोशायरी, विडंबन गीते, कविता, विनोदी चुटकुले या हास्य पंचमीला सर्वांनी भरभरुन दाद दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर होते. तर प्रमुख पाहुणे डॉ. संजय सावंत, सुभाष चांदगुडे होते.
याप्रसंगी राहुल निकम, सचिन लोणकर, नाना पाटील जगदाळे, निलेश पानसरे, गणेश खैरे, शकील तांबोळी तसेच सुपे पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी उपस्थित होते. रोटरी क्लब सुपा परगना अध्यक्ष व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योगचे अध्यक्ष सुभाष चांदगुडे यांचे कार्यक्रमास सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष कोंडे यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय अशोक बसाळे यांनी केला. तर सुदाम नेवसे यांनी आभार मानले. ----------------------------------