पुरंदर l चांबळी येथे बावीस वर्षानी भरला दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 गराडे : प्रतिनिधी
श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ , पुरंदर संचलित कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी (ता. पुरंदर) येथील सन 2001-02  दहावीच्या बॅचचा तब्बल 22 वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व वर्गशिक्षक 2002 च्या बॅचचे वर्गशिक्षक बबन गायकवाड होते.
     उपस्थित सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार केला.यावेळी पंढरीनाथ कोलते,हरिदास कामठे,चांगदेव म्हस्के,रोहिदास सावंत,मोहन केशव कटके,हरिदास कामठे,मीना खैरे ,हसीना आतार,मंगल कामठे-पठारे ,शैला कोलते ,शिवाजी कामथे ,अरविंद चिव्हे व
विद्यमान कार्यरत शिक्षक अमोल कोकरे,अमृता डोके ,सुषमा सावंत , अशोक  खैरे,संदीप कदम, संजय गायकवाड,मधुकर कामठे  उपस्थित होते.
     दहावीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या दिवंगत शिक्षकवृंदांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
     या दहावीच्या वर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सातारा. येथील अधिकारी कृष्णा फडतरे यांचा उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष सन्मान केला.
      कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी राजेश कामठे, प्रकाश शेंडकर, सूर्यकांत कामठे,नवनाथ कामठे, मुकुंद शेंडकर, सारिका कामठे ,पल्लवी कामठे आदीसह विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या सर्वच  माजी विद्यार्थ्यांनी उत्तम नियोजन केले.
   दरम्यान शाळेतील एक वर्ग पूर्णपणे दुरुस्त करणे व शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले.
   उपस्थित शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कृष्णा फडतरे व  सारिका कामठे  यांनी केले.
To Top