सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने वाई पोलीस ठाणेचे हद्दीमधील एकसर येथे आरोपी राजेश शंकर सणस याचेकडुन बेकायदेशीर विदेशी बनावटीचे एक रिव्हॉलवर व देशी बनावटीचे एक पिस्टल असे एक लाख २० हजाराच्या मुद्देमाल हस्तगत करत एकास जेरबंद केले आहे.
दिनांक १६ रोजी वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांना त्यांचे खास बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे हद्दीमधील एकसर गावाचे बसस्थानकाचे परिसरात एक संशयित इसम हा विनापरवाना अग्निशस्त्र कमरेला लावुन फिरत आहे. अशी खात्रीलायक बातमी प्राप्त होताच त्यांनी त्यांचे अधिनस्थ गुन्हेप्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांना सदर बातमीचे अनुषंगाने सापळा रचुन संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या प्राप्त बातमीच्या आधारे वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने एकसर गावामधील बसस्थानक येथे सापळा लावला असता, त्याठिकाणी एक इसम हा संशयितरितीने फिरतांना दिसला त्याचा गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांना वाजवी संशय आल्याने, त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश शंकर सणस सध्या रा. एकसर ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याची तपासपथकातील अंमलदार अधिकारी यांनी अंगझडती घेतली असता त्याचे कमरेचे डावे बाजुस १ विदेशी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळाले ते ताब्यात घेऊन त्याची अधिक बारकाईने अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेचे पाठीमागे मध्यभागी पॅन्टमध्ये १ देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले दिसले.
त्यास पुढील तपासकामी अटक करण्यात आलेले आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन माहे नोव्हेंबर २०२२ पासुन ते आज अखेर १०९ देशी बनावटीची पिस्टल ०४ वारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत.