सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती आगाराच्या एसटी कामगार संघटनेच्या २०२५ च्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्रीनाथ शेलार व सचिवपदी दादासाहेब साळवे यांची बहुमताने निवड झालेली आहे. अध्यक्ष आणि सचिनपदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केले मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. सचिवपदाच्या शर्यतीत असणारे दोन्ही उमेदवार प्रदीर्घ अनुभवी आणि तगडे असल्याने या लढतीकडे संपुर्ण पुणे विभागाचे लक्ष लागले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत दादासाहेब साळवे हे मोठया मताधिक्याने निवडून आले.
निवडणूक शांततापुर्ण वातावणात पार पाडण्यासाठी व यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहीद सय्यद, प्रकाश काळभोर, रविद्र कांबळे, सोनबा वाडकर, बापूराव पवार, विकास भोसले, राजेंद्र गवंडी, विकास सावंत व संग्राम कोंढाळकर यांनी विशेष भूमिका बजावली. सर्वांच्या सहकार्याने निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर आगारात डीजे वाजवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, उपस्थितांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
निवडणूकीत सोमनाथ लोखंडे, सचिन मोरे, सागर दिघे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका बजावली.
-----------------------
येणाऱ्या काळात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, विभागीय अध्यक्ष मोहन जेधे व विभागीय सचिव दिलीप परब यांचे मार्गदर्शन घेऊन कामगारांच्या प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवून कामगारांना न्याय आणि दिलासा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
- दादासाहेब साळवे (नवनियुक्त सचिव)