Baramati News l वाणेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी-चव्हाणवाडी येथील युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३१ बाटल्या रक्त संकलन झाले. 
वाणेवाडी येथे विरंगुळा भवन येथे रक्तदान शिबीर पार पडले. अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या वतीने हे रक्त संकलन करण्यात आले. वाणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्पूर्त सहभाग घेतला. वाणेवाडी येथील डॉ. प्रदीप भोसले, डॉ. विलास काटकर, डॉ. अमोल जगताप यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. तसेच युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबचे कार्यकर्ते दुशंत चव्हाण, अभिजित चव्हाण, अभय चव्हाण, गणेश चव्हाण, दिगु , तुषार माने, सागर चव्हाण, साहिल चव्हाण, लाला चव्हाण, गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
To Top