Baramati News l राज्यस्तरीय 'नृत्य मल्हार' डान्स स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानचा अथर्व गरुड राज्यात पहिला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य मल्हार डान्स स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान शाळा सोमेश्वरनगरच्या अथर्व कालिदास गरुड याने फोक डान्स या प्रकारात तान्हाजी थीम या गाण्यावर डान्स करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
       पुणे-येरवडा येथे अण्णाभाऊ साठे सभागृह येथे या पार पडल्या. या स्पर्धा सलग तीन दिवस चालू होत्या. यामध्ये महाराष्ट्रातून 285 शाळांनी सहभाग घेतला होता. लहान गट, मध्यम गट, आणि मोठा गट तसेच सोलो, डुएट, ट्रायो,आणि ग्रुप असे डान्स प्रकारचे वर्गीकरण होते. यामध्ये शिवराज सचिन अधटराव याने द्वितीय क्रमांक मिळवला. सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर
 या शाळेत शिकणाऱ्या प्रांजली राजेंद्र गायकवाड व कार्तिक गौतम लोखंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सगळे विद्यार्थी सोमेश्वरनगर येथे सुरू असलेल्या. YN डान्स अकॅडमी मध्ये शिकतात. कोरीग्राफर योगेश ननवरे, पार्थ साळवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
To Top