Bhor News l बनेश्वरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा चार मार्चला आमरण उपोषण : खा. सुप्रिया सुळेंचा जिल्हा प्रशासनाला गंभीर इशारा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर ता.भोर येथील बनेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.महाशिवरात्रीच्या प्रारंभी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. रस्त्याची वर्क ऑर्डर काढून दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. तात्काळ बनेश्वर चा रस्ता दुरुस्त करा अन्यथा चार मार्चपासून आपण आमरण उपोषणाला बसू असा गंभीर इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला दिला आहे. 
        महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवार दि.२६ पहाटे बनेश्वर देवस्थान येथे दर्शन घेण्यासाठी खासदार सुळे आल्या होत्या.दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बनेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे म्हणून ग्रामस्थांसह आपण स्वतः वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे.त्यासाठी पत्र पाठवली आहेत. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूचना देण्याबरोबरच निवेदने आणि ग्रामस्थांच्या सह्यांची पत्रेही वारंवार दिली आहेत. प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून देऊनही प्रत्यक्ष आज महाशिवरात्री आली तरी तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष केले.अद्याप वर्क ऑर्डर सुध्दा काढली गेली नाही.ही अत्यंत गंभीर बाब असून हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही किंवा किमान वर्कऑर्डर काढली गेली नाही तर येत्या ४ मार्च पासून आपण स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे सुळे यांनी म्हटले आहे.अलीकडेच याबाबत त्यांनी आणखी एक पत्र दिले होते त्याची आठवण करून देत सुळे यांनी ट्विट देखील केले आहे. 
                                     
Tags
To Top