सुपे परगणा l दीपक जाधव l आई-वडील दोघेही ग्रामपंचायतमध्ये शिपाई : पोरीने नाव काढलं...पहिल्याच प्रयत्नात बनली मुंबई पोलीस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामपंचायतीच्या शिपाई असलेल्या भगवान सकटच्या मुलीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात यश मिळविल्याने सर्वच स्तरातुन तिचे कौतुक होत आहे. 
            अश्विनी भगवान सकट असे मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या मुलीच नाव आहे. अश्विनीची आई सुनिता ही सुपे ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणुन कार्यरत आहे. तर वडील सुद्धा शिपाई म्हणुन ग्रामपंचायतीत कामाला आहेत. अश्विनीला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. तिच्या घरची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मात्र अश्विनीने  जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात भरती झाली. तिचे सुप्यातील जिल्हा परिषद शाळा, श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मधुन १२ पर्यंतचे शिक्षण झाले. तर विद्या प्रतिष्ठाण कॉलेजमधुन अर्थशास्त्र हा विषय घेवुन बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. 
             तिने माळेगाव येथील परफेक्ट ॲकॅडमी मध्ये एक वर्ष सराव केली. यावेळी तिने ग्राऊंड आणि लेखी परिक्षेचे धडे घेतले. तिने जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात खाकी वर्दीला गवसणी घातली. यात तिने १२४ गुण मिळविले. कठीन परिस्थितीतुन मिळविलेल्या खाकी वर्दीमुळे सर्वच स्तरातुन तिचे अभिनंदन होत आहे. 
              .................................
          
To Top