सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता चांगली असुन त्यास योग्य मार्गदर्शन व वेळेचे नियोजन केल्यास त्यांच्या गुणवत्तेमध्ये चांगली वाढ होईल विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करुन शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्या ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.
राजगड तालुक्यातील विंझर येथील अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ज्योत्स्ना एकबोटे बोलत होत्या शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांकडे जिद्द आणि चिकाटी मोठ्या प्रमाणात असते येथील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी चांगले यश मिळवु शकतात.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असेही यावेळी त्यांनी सांगितले,
तर कला वाणिज्य व विज्ञान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हा शिष्यवृत्ती कार्यक्रम मूळचे विंझर गावचे असलेले उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायमूर्ती मा.माधव जानू बोरगे यांच्या संकल्पनेतून आली, हे या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष असुन या वर्षी शिष्यवृत्ती .प्रदीप शिवराम फडके .डॉ महादेव दत्तू डोंगरे डॉ विजय बापू कदम यांच्या माध्यामातुन
देण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज विंझर मधील 2023 -24 मधील इयत्ता दहावी, अकरावी, बारावी कला व वाणिज्य तसेच
अमृतेश्वर विज्ञान ज्युनियर कॉलेज आणि अमृतेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विंझर यांचे मिळून एकूण 66 विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह
तसेच पुणे महानगर पालिका माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप फडके सचिव अशोक भूरुक, माजी संचालक हणमंत लिम्हण,
सुप्रिया फडके, प्राचार्य डॉ संजीव लाटे, डॉ महादेव डोंगरे, डॉ विजय कदम ,डॉ राहुल कांबळे,डॉ.रितेश वांगवाड, डॉ बाळासाहेब केदळे, प्रा.अंकुश नामदास, प्रा. रामचंद्र मोकाशी, डॉ शीतल शेंडकर, डॉ योगेश श्रीखंडे, डॉ परमेश्वर गडकर, प्रा. सुजीतकुमार माने, प्रा. मनोजकुमार टापरे ,डॉ शेळके दीपक, डॉ अश्विनी पाटील विजय लिम्हण, विलास गायकवाड, संदीप पवार, लिम्हण सदाशिव, समीर भोसले, मोहन चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून डॉ सुरेश मुळूक यांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ सीमा चौधरी व प्रा.कोमल
आधवडे यांनी व आभार प्रा. किरण जाधव यांनी मानले.
महाविद्यालयातील दोन गरीब व होतकरु गुणवंत विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासुन दत्तक घेणार असल्याचे डॉ.महादेव डोंगरे यांनी सांगितले.