Baramati News l 'सोमेश्वर'ची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारावर मोहर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने जाहीर केला 'हा' पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने उत्कृष्ट वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. 
         याबाबत राष्ट्रीय साखर संघाने सोमेश्वर कारखान्याशी पत्रव्यवहार करत ही माहिती दिली आहे. संघाने दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की, 
आपल्या सोमेश्वर कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यप्रणालीतील उत्कृष्टतेची दखल घेऊन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेडची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली (एनएफसीएसएफ) कडून प्रतिष्ठित वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार २०२३-२४ साठी निवड झाली आहे.  मूल्यांकनाच्या आधारे, भारत सरकारच्या सहसचिव, सहकार मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने निकाल अंतिम केले आहेत. तुमच्या कारखान्याची उच्च साखर पुनर्प्राप्ती क्षेत्रातील एकूण कामगिरीच्या श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान केला जाईल.

पुरुषोत्तम जगताप : अध्यक्ष सोमेश्वर कारखाना सोमेश्वर कारखाना 
नेहमीच राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील महिन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन व उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर असे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया चा को जनरेशनला देशातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने सोमेश्वर कारखान्याला वार्षिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे.
To Top