Baramati News l गडदरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वनिता हाके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गडदरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी वनिता बजरंग हाके यांची बिनविरोध निवड झाली. 
           उपसरपंच सीमा विशाल गलांडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्तपदी सरपंच मालन पांडुरंग गडदरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सीमा विशाल गलांडे,स्वाती राजेंद्र गडदरे, सदस्य सागर भिमराव गडदरे ग्रामस्थ विशाल गलांडे, गुलाब हाके, अजित मदने उपस्थित होते. निवड झाल्याबद्दल माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे, मार्केटिंग फेडरेशनचे संचालक राहुल काकडे यांनी अभिनंदन केले यावेळी बोलताना उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थाचे आभार मानले व गावाचा चांगल्या प्रकारे विकास करील अशी ग्वाही दिली.
To Top