सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
निरा डाव्या कालव्यावरील दोन्ही बाजूच्या शेती पंपाचा एकत्रित पाणी उपसा चालू असल्यास मोठ्या प्रमाणात उपसा होऊन कालव्याचा गेज (पातळी) पडते व पाणी पातळी कमी होते, त्यामुळे बारामती व निमगाव भागातील शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने सिंचन आवर्तनात विस्कळीतपणा येतो. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या दोन्ही बाजूकडील सिंचनासाठी असलेले शेतीचेरोहित्रे (फिडर) टप्या-टप्याने एक आठवड्यासाठी बंद करण्याचे नियोजन करावे अशा आशयाचे पत्र पाठबांधरे खात्याकडून महावितरणला देण्यात आले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की, नीरा डावा कालव्याचे आवर्तन दि.११ मार्च पासून सुरू झाले आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वडगाव, पणदरे, माळेगाव व मळद शाखा कार्यालयाच्या मुख्य कालव्यावर दोन्ही बाजूस शेतीचे पंप (अधिकृत व अनधिकृत) चालू असतात. सर्व शाखा कार्यालयाचा एकत्रित पाणी उपसा चालू असल्यास मोठ्या प्रमाणात उपसा होऊन कालव्याचा गेज (पातळी) पडते व पाणी पातळी कमी होते, त्यामुळे खालील बारामती व निमगाव भागातील शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलबद्ध होत नसल्याने सिंचन आवर्तनात विस्कळीतपणा येतो.
तरी, नीरा डावा कालव्याच्या दोन्ही तीरावरील सिंचनासाठी असलेले शेतीचे रोहित्रे (फिडर) टप्या-टप्याने एक आठवड्यासाठी बंद करण्याचे नियोजन करावे.