Baramati News l सुप्यातील बाजारात चिंचेला सोन्याची झळाळी : अखंड चिंचेला ८ हजार तर फोडलेल्या चिंचेला १२ हजारांचा बाजारभाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
सुपे (ता. बारामती) येथील उपबाजारात शनिवारी झालेल्या या हंगामातील तिसऱ्याच बाजारात अखंड चिंचेला ८ हजार ३०० तर फोडलेल्या चिंचेला १२ हजार प्रति क्विंटल ऐवढा विक्रमी बाजारभाव मिळाला. चिंचेची आज चालु हंगामातील ८ हजार ५०० पोत्यांची आवक झाली आहे. यावर्षी चिंचेचे उत्पादन घटल्याने चिंचेला सोन्याची झळाली आली आहे.         
           यावर्षीच्या चालू हंगामात आतापर्यंत १३ हजार ५०० पोत्यांची अखंड चिंचेची आवक झाली आहे. आजच्या बाजारात अखंड चिंचेस किमान २५०० ते कमाल ८३०० व सरासरी ३७०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला. तर फोडलेल्या चिंचेची दोनशे पोत्यांची आवक झाली असून त्यास ९४०० ते १२००० इतके प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.        
             येथील उपबाजारात बारामती तालुक्यासह फलटण, इंदापूर, दौंड, भोर, शिरूर आधी ठिकाणावरून चिंचेची आवक होते. सध्या चिंचेचे बाजारभाव वाढलेले असून शेतकऱ्यांनी चांगला बाजारभाव मिळण्याकरिता चिंचमाल स्वच्छ वाळवून आणण्याचे आवाहन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले.  तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मालाचे लिलावा पुर्वी वजन केले जाते. त्यानंतर आकरा वाजता चिंचेचे लिलाव होताच मालाची रोख पट्टी दिली जाते. आज आवक वाढल्याने संध्याकाळ पर्यंत लिलाव सुरु होते. उद्या ( रविवारी )
राहिलेल्या मालाचे लिलाव होणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.  दरम्यान गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी चिंचेच्या उत्पादनात ५० टक्के घट आहे. मात्र बाजारभाव असल्याने बाहेरचा माल विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे चिंचेची आवक वाढुनही बाजार वाढल्याची माहिती आडत व्यापारी सुभाष चांदगुडे यांनी दिली.       
To Top