Bhor News l नेरे येथे जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील शेतकरी महादेव सिताराम कदम(नेरे) यांच्या घराशेजारील जनावरांना साठवून ठेवलेल्या चाऱ्याला अचानक लागलेल्या आगीत जाऊन खाक झाल्याने शेतकऱ्याचे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.नशीब बलवत्तर म्हणून तरुणांच्या सतर्कतेने आगीच्या शेजारील घरे बचावली.
    आग गावच्या मध्यस्थानी लागली होती.स्थानिक तरुण तसेच ग्रामस्थांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पराकष्टीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने चारा जळून खाक झाला.काही वेळातच भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.तात्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी पोचून आग विझवली.मात्र आगीत गवत - ९००, कडबा -१०००,भातव्यान -१००० असे एकूण ४० हजारांचे नुकसान झाले.शहरात तसेच ग्रामीण भागात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. नागरिकांनी अशा घटना घडविण्यात यासाठी सतर्क असे आवाहन नेरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा बढे,प्रकाश कदम यांनी केले.नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी नेरे पंचक्रोशीतील शेतकरी वर्गातून होत आहे.
Tags
To Top